नागपूर : महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर आमच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती देण्यात आली आहे. पण, आता शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या निधी वाटपावरून लाथाळ्या वाढतील. हे तिघेही एकमेकांचे कपडे फाडताना दिसतील, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते आज सकाळी नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

निधी वाटपावरून भेदभाव केला जात आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघासाठी निधी दिला जात नाही. याबाबत विचारले असता वडेट्टीवार म्हणाले, आमच्या मतदारसंघातील कामांना स्थगिती सरकारने दिली आहे. आता सत्तेत सहभागी असलेल्यांमध्ये निधी वाटपावरून लाथाळ्या वाढणार आहेत.

हेही वाचा – “अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्याची भाजपची अट…” वडेट्टीवार यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – गडचिरोली: कामचुकारपणा भोवला; शिपाई वगळून अख्खे उपविभागीय कार्यालय निलंबित

पावसाचे प्रमाण कमी असून अनेक भागांत दुष्काळी स्थिती आहे. भविष्यात पाण्याची टंचाई होईल. पण सरकार सभा घेण्यात व्यस्त आहे. दुष्काळी स्थितीकडे सरकारने दुर्लक्ष झाल्यास लोक त्यांना फिरू देणार नाहीत, असेही ते म्हणाले.