अकोला: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सर्व क्षेत्रात हस्तक्षेप वाढला आहे, यातून निवडणूक आयोग व न्यायव्यवस्था सुद्धा सुटलेली नाही, असा आरोप काँग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केला. जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील सौंदळा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनसंवाद पदयात्रा अभियान राबवले. या पदयात्रेमध्ये विजय वडेट्टीवार सहभागी झाले. यावेळी ते बोलत होते.

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धाब्यावर बसवून मोदी सरकारचा मनमानी कारभार देशात सुरू आहे. या मनमानी कारभाराचा फटका सर्व जनतेला बसत आहे. सरकारला जनता देखील त्रस्त झाली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. जनहितासाठी आता बदल करायचा आहे. पुन्हा जनतेच काँग्रेस सरकार निवडून द्यायचे आहे, ही भावना सर्व नागरिकांमध्ये असल्याचे आ.वडेट्टीवार म्हणाले.