कोंबडी खाल्ल्याचा राग आल्याने भटक्या श्वानाला ठार मारून त्यास रस्त्यावरून फरफटत नेल्याची क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना हिंगणघाट येथे घडली.या प्रकरणी दीपक, गोलू व आशीष हेडाऊ या तीन मजुरांवर प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीच्या पाळीव कोंबडीचा फडशा भटक्या श्वानाने पाडला. त्याचा राग आल्याने श्वानास ठार मारून फरफटत नेण्यात आले होते. या क्रूर कृत्याची चित्रफित समाज माध्यमातून सार्वत्रिक झाली. निसर्गसाथी फाऊंडेशनने त्याची दखल घेत पोलिसांकडे तक्रार केली.

गावात भटक्या श्वानांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे –

यावरून पोलिसांनी या घटनेचे साक्षीदार असलेल्या नागरिकांचे जबाब नोंदवित कारवाई केली. श्वानाचा मृतदेह दोरीने बांधून तेलीपुरा परिसरात फरफटत नेल्याची घटना चांगलीच चर्चेत आली आहे. कारण गावात भटक्या श्वानांनी चांगलाच उच्छाद मांडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…असा संताप मुक्या प्राण्यांवर काढणे निंदनीयच –

निसर्गसाथीचे प्रवीण कडू म्हणाले की, भटक्या श्वानांसोबतच उच्चप्रजातीचे श्वान पाळणे कठीण झाले की सुबुद्ध नागरिकसुद्धा त्यांना वाऱ्यावर सोडतात, त्याचा सर्वसामान्यांना मोठा त्रास होत आहे, हे मान्य. पण असा संताप मुक्या प्राण्यांवर काढणे निंदनीयच. त्यामुळे आम्ही पोलीस तक्रार दिली.