scorecardresearch

Premium

सावधान! लग्नसमारंभ, वाढदिवस कार्यक्रम आयोजित करताय? तर मग हे वाचाच…

राज्यात लग्नसमारंभ, वाढदिवस तसेच मोठ्या प्रमाणात जेवणाचे कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी आता अन्न व औषध प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी निर्देश दिले आहेत.

Minister Atram
सावधान! लग्नसमारंभ, वाढदिवस कार्यक्रम आयोजित करताय? तर मग हे वाचाच… (image credit – loksatta team/pixabay/loksatta graphics)

गडचिरोली : राज्यात लग्नसमारंभ, वाढदिवस तसेच मोठ्या प्रमाणात जेवणाचे कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी आता अन्न व औषध प्रशासनाची रीतसर परवानगी घ्यावी, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी निर्देश दिले आहेत. गडचिरोली येथे अन्न व औषध विभागाच्या इमारतीचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी मंत्री आत्राम यांनी विधानभवन परिसरातील उपहारगृहातील अस्वच्छतेबद्दल भाष्य करून त्यांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगीची अट घातली होती. अनेकदा जेवणातून होणाऱ्या विषबाधेचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे लग्नसमारंभ असो की वाढदिवस ज्या ठिकाणी जेवणाचे मोठे आयोजन केल्या जाते यापुढे त्यांनादेखील अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल, असे मंत्री आत्राम म्हणाले.

Mallikarjun Kharge writes to Mamata Banerjee requesting security for Bharat Jodo Nyaya Yatra
‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरक्षा पुरवावी! मल्लिकार्जुन खरगे यांची ममता बॅनर्जीना पत्र लिहून विनंती
Ajit Pawar on Jarange
मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना निघाल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काल रात्रीपर्यंत…”
various parties protested against governments by carrying out funeral procession of evm
सातारा शहरातून ईव्हीएमची अंत्ययात्रा; केंद्र व राज्यातील सरकारच्या निषेधार्थ घोषणा
Orange Export Subsidy Scheme implemented at end of season Anger among farmers
हंगाम संपल्‍यावर संत्री निर्यात अनुदान योजना लागू; शेतकऱ्यांमध्‍ये रोष

हेही वाचा – आता हे काय नवीन! रुग्णांकडे लक्ष द्यावे, की वाहन सांभाळावे? रुग्णांच्या नातेवाईकांसमोर यक्ष प्रश्न…

हेही वाचा – गोंदिया : पावसाने उसंत घेतल्याने धान मळणीला गती; मात्र, अवकाळी पावसामुळे….

गडचिरोली येथे आजपर्यंत अन्न व औषध विभागाची स्वतंत्र इमारत नव्हती. मात्र, आपण मंत्री झाल्यानंतर सर्वात आधी यासाठी प्रयत्न केले व आज त्याचे भूमिपूजन पार पडत आहे, असेही आत्राम यांनी यावेळी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What did minister atram say on the wedding ceremony and birthday program ssp 89 ssb

First published on: 10-12-2023 at 14:29 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×