गडचिरोली : जिल्ह्यातील कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर २३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. याला आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असून दोषी डॉक्टर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे. अशी मागणी जिल्हा काँग्रेस आदिवासी आघाडीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

हेही वाचा – “धारावी बचाओ, अदाणी हटाव” विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने

हेही वाचा – ‘‘शिवाजी महाराज सुरत लुटायला गेले, तुमच्यासारखे…” अंबादास दानवे यांची शिंदे गटावर टीका; म्हणाले, “छत्रपतींचा अपमान करण्याची…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडचिरोली जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्याचे धिंडवडे निघत आहे. अशात ८ डिसेंबरला कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबीर घेण्यात आले होते. यात मृत साधना जराते यांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु १० डिसेंबरला मध्यरात्री साधनाची प्राणज्योत मालवली. त्यांच्यापश्चात दोन लहान मुले पोरकी झाली आहे. याप्रकरणी दोषी डॉक्टर व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना तत्काळ निलंबित करून विशेष समितीमार्फत तपास करण्यात यावा अशी मागणी शेडमाके यांनी केली आहे.