News Flash

”कलम ३७० दहशतवाद्यांसाठी ढाल बनले होते, देशहितासाठी हटवले”

केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मांडली बाजू

संग्रहीत छायाचित्र

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हे दहशतवाद्यांसाठी ढाल बनले होते, देशहितासाठी ते हटवल्या गेले. असे केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शनिवारी नागपूर येथे राज्य विधी सेवा अधिकाऱ्यांच्या १७ व्या अखिल भारतीय बैठकीच्या उद्घाटनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

यावेळी रवीशंकर प्रसाद म्हणाले की, सरकारने देशाबरोबरच जम्मू-काश्मीरच्या सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने कलम ३७० बाबत निर्णय घेतला. आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे की ही एक अस्थायी तरतूद होती व ती देशहितासाठी हटवण्यात आली.

आम्ही सदैव देश आणि जम्मू-काश्मीरच्या लोकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्नशील आहोत. आमची इच्छा आहे की, जम्मू-काश्मीरची प्रगती व्हावी. कलम ३७० दहशतवादी आणि त्यांच्या आश्रयदात्यांसाठी ढाल बनले होते, मात्र आम्ही ते काढून टाकले.काश्मीरच्या विकासासाठी असे केले गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 9:25 pm

Web Title: section 370 had become a shield for terrorists deleted for patriotism msr 87
Next Stories
1 ‘आमदार फोडण्यासाठी सत्तेचा वापर नाही, चांगल्या लोकांनाच पक्षात प्रवेश’
2 इस्रोकडून ‘रीसॅट-२बी’ उपग्रहाचे प्रक्षेपण; ‘पीएसएलव्हीसी ४६’ मोहिम यशस्वी
3 मराठा आरक्षणाबाबत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार : मुख्यमंत्री
Just Now!
X