26 November 2020

News Flash

जिल्ह्य़ातील करोना सक्रिय रुग्णांमध्ये २२७ ने घट

आतापर्यंत एक हजार ६५५  रुग्णांचा मृत्यू झाला

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून २४ तासात हा आलेख अधिकच कमी झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत बुधवारी प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील ८५  हजार ३०७ करोना बाधितांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले असून  सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या सक्रि य रूग्णांमध्ये २२७ ने घट झाली आहे. आतापर्यंत एक हजार ६५५  रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक १८९, चांदवड ५८, सिन्नर ५०८, दिंडोरी २५३, निफाड ६१७, देवळा ५१, नांदगांव २७९, येवला ८६, त्र्यंबकेश्वर ८२, सुरगाणा आठ, पेठ तीन, कळवण ४२,  बागलाण १४८, इगतपुरी १५८, मालेगांव ग्रामीण १५८ याप्रमाणे एकूण दोन  हजार ६४७ करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दोन हजार ६४०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ९७ तर जिल्ह्याबाहेरील ८१  असे एकूण पाच  हजार ४६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ९२  हजार ४२७ रुग्ण आढळून आले आहेत. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ८७.७६,  टक्के, नाशिक शहरात ९४.२७  टक्के, मालेगाव मध्ये  ९३.६०  टक्के तर जिल्हा बा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.९३ टक्के आहे. जिल्हा परिसरात नाशिक ग्रामीण, महापालिका आणि मालेगाव महानगरपालिका, जिल्हाबाहेरील अशा एक हजार ६५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 2:30 am

Web Title: coronavirus active cases in the nashik district decrease by 227 zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 कांद्याविषयी केंद्राची परस्परविरोधी भूमिका!
2 कांद्याचे घाऊक बाजार दुसऱ्या दिवशीही ठप्प
3 विनायकदादांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनार्थ शरद पवार आज नाशिकमध्ये
Just Now!
X