महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाची कारागृहास भेट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अ‍ॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाने नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहातील उद्योग विभागास भेट दिली. तेथील उद्योग, उत्पादनांची शिष्टमंडळाने माहिती घेतली. कारागृहातील उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करणे, बंदिवानांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी ‘जॉब वर्क’ देणे, बंदिवानांना कुशल कारागीर बनविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

या वेळी कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, महाराष्ट्र चेंबरच्या सीएसआर अ‍ॅण्ड एचआर समितीचे अध्यक्ष श्रीधर व्यवहारे, कृषी समितीच्या सुनीता फाल्गुने, सुधीर पाटील, डॉ. उदय खरोटे आदी उपस्थित होते. व्यवहारे यांनी महाराष्ट्र चेंबरच्या कार्याची माहिती देऊन कारागृहाला भेट देण्याचा उद्देश स्पष्ट केला. फाल्गुने यांनी कारागृहातील बंदिवानांनी तयार केलेली उत्पादने बघून येथील बंदिवान भविष्यात निश्चित स्वत:चा उद्योग सुरू करू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र चेंबर त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करील, असे त्यांनी सांगितले. कारागृहातील उद्योगांना विकसित करण्याच्या दृष्टीने कशा प्रकारे मदत करता येईल, याविषयी मत व्यक्त केले. कारागृहातील उद्योगाला आर्थिक मदत करून विकसित करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले. तुरुंगाधिकारी, उद्योग विभागाच्या प्रमुख पी. पी. कदम यांनी आभार मानले. शिष्टमंडळात मिथिला कापडणीस, अर्चना मानेक, सचिन शहा, अमित अलई आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jail products provide to market
First published on: 19-09-2018 at 03:21 IST