News Flash

तोफखाना प्रशिक्षण केंद्राची छायाचित्रे पाकिस्तानात पाठविणाऱ्यास अटक

संबंधिताने ही छायाचित्रे पाकिस्तानातील काही व्हॉट्सअ‍ॅप गटावर पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

नाशिक : तोफखाना विभागाच्या देवळाली येथील मुख्य प्रशिक्षण केंद्रातील प्रतिबंधित क्षेत्राची छायाचित्रे पाकिस्तानात पाठविणाऱ्यास लष्कराने ताब्यात घेतले. संबंधिताने ही छायाचित्रे पाकिस्तानातील काही व्हॉट्सअ‍ॅप गटावर पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या तक्रारीनंतर संशयित संजीवकुमार (२१, मूळ राहणार गोपालगंज, बिहार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दहशतवाद विरोधी पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली.

देवळाली कॅम्पमधील पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. हे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडे संशयित संजीवकुमार कार्यरत होता. २ ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास प्रशिक्षण केंद्राच्या एमएच प्रवेशद्वारासमोर तो भ्रमणध्वनीतून छायाचित्र काढत असल्याचे सुरक्षारक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी ताब्यात घेऊन त्याला लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या स्वाधीन केले.

संजीवकुमारच्या भ्रमणध्वनीची तपासणी केली असता प्रतिबंधित क्षेत्रातील छायाचित्रे त्याने पाकिस्तानातील व्हॉट्सअ‍ॅप गटावर पाठविल्याचे निदर्शनास आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 1:37 am

Web Title: man arrested for sending photographs of artillery training center to pakistan zws 70
Next Stories
1 अनधिकृत बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा
2 करोनाचा कहर : उपचार घेणाऱ्या करोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ
3 करोना उपचार खर्च कमी होण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेची जनजागृती
Just Now!
X