नाशिक – नाशिकसह सिन्नर परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शनिवारी रात्री घरातून कामानिमित्त बाहेर पडलेल्या ३० वर्षाच्या युवकावर बिबट्याने हल्ला केला. युवकाने प्रतिकार केल्याने त्याचा जीव वाचला. जखमी युवकाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पावसामुळे बिबट्याचा शोध घेण्यात अडचण येत आहे.

हेही वाचा >>> नाशिक : सिडकोत रस्ता काँक्रिटीकरणासाठी खोदकामामुळे गैरसोय; घरांचे ओटे तोडल्याने संताप

दोन दिवसापूर्वी सिन्नर तालुक्यातील सोमठाण शिवारात कृष्णा गिते या १७ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. या प्रकारास २४ तास होत नाही तोच पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला. शनिवारी रात्री साडे आठ वाजता विष्णु तुपे (३०) हे मळ्यातून गावात दुचाकीवर जात असतांना ऊसशेतीत लपलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. तुपे यांनी प्रतिकार केल्याने बिबट्या पळाला. तुपे यांना तातडीने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीची वनअधिकाऱ्यांनी भेट घेतली. दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे बिबट्याचा माग घेण्यास वन अधिकाऱ्यांना अडचणी येत असून या ठिकाणी पिंजरा लावण्यातही समस्या येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.