नाशिक – जिल्ह्यातील बहुतांश भागात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने ३२ हजार ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक ११५९७ हेक्टर द्राक्षबागांचा समावेश असून त्या खालोखाल साडेदहा हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ८९० गावांतील ६७ हजार ८६६ शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला.

रविवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत अनेक भागांना गारपीट आणि अवकाळीने झोडपले. एका झटक्यात होत्याचे नव्हते झाले. सोमवारी काही भागांत अवकाळीने हजेरी कायम ठेवल्याने नुकसानीचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालावरून रविवारच्या गारपीट व अवकाळी पावसात ३२ हजार ८३२ हेक्टरवरील जिरायत, बागायत क्षेत्रासह बहुवार्षिक फळपिकांचे नुकसान झाले. इगतपुरी (१२२), कळवण (११८), निफाड (१०२), दिंडोरी (९८), नाशिक (८९), नांदगाव (८८), सटाणा (७६), सुरगाणा (७१), पेठ (६४), चांदवड (३०), त्र्यंबकेश्वर (२०). सिन्नर (नऊ), येवला (पाच) अशा १३ तालुक्यांतील एकूण ८९० गावांत पिकांचे नुकसान झाले. मालेगाव, देवळा तालुक्यातील पिके काहीअंशी बचावली. या तालुक्यातील एकाही गावाचा प्राथमिक अहवालात समावेश नाही.

nashik, Unseasonal Rain, Damages Crops, 107 Villages, Nashik District, farmers, nashik Unseasonal Rain, 729 hecters, surgana, trimbakseshwar, baglan, peth, nashik, nashik news, unseasonal rain nashik
अवकाळीचा नाशिक जिल्ह्यातील ७२९ हेक्टरवरील पिकांना फटका
Damage to crops on 82 thousand hectares due to hailstorm
गारपिटीमुळे ८२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, जाणून घ्या, जिल्हा, पिकनिहाय नुकसान
Loss of crops on three and a half thousand hectares due to unseasonal rain
बुलढाणा : ‘अवकाळी’चा शंभर गावांना फटका, साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी; ३०९ घरांची पडझड
500 houses collapsed in two days due to unseasonal rain in Yavatmal woman died due to lightning
यवतमाळात अवकाळीने दाणदाण; दोन दिवसांत ५०० घरांची पडझड, वीज कोसळून महिलेचा मृत्यू, तिघे गंभीर

हेही वाचा – दरोडेखोरांनी अपहरण केलेल्या साक्रीतील युवतीचा शोध

गारपीट, अवकाळीने ११ हजार ५९७ हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले. नवीन लाल कांदा काढणीवर आला होता. पावसात १० हजार ४०८ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. ४६७ हेक्टरवरील कांदा रोपे पाण्यात गेल्याने उन्हाळ कांद्याची लागवड अडचणीत येणार आहे. भात (६७२९ हेक्टर), गहू (५७८), टोमॅटो (३१०), भाजीपाला व इतर (१७९५), मका (१६९), ऊस (२२१ हेक्टर) नुकसान झाले. सुमारे ३४ हेक्टरवरील डाळिंबा बागांनाही फटका बसल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जिरायत क्षेत्रातील ४८८ हेक्टरवरील भाजीपाल्याचे नुकसान झाले. जिरायत व बागायत क्षेत्राचा विचार केल्यास सुमारे २२०० हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

निफाडला सर्वाधिक झळ

नैसर्गिक संकटाचा सर्वाधिक फटका निफाड तालुक्याला बसला. या तालुक्यातील ९२९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मालेगाव व देवळा तालुक्यात नुकसान झाले नाही. परंतु, उर्वरित सर्व तालुक्यांना झळ बसली. सटाणा तालुक्यात (५७० हेक्टर), नांदगाव (३२५३), कळवण (७७३). दिंडोरी (२९६४), सुरगाणा (२२५), नाशिक (८६८), त्र्यंबकेश्वर (२२८), पेठ (५५६), इगतपुरी (५९२०), सिन्नर (३७), चांदवड ७५७७) आणि येवला तालुक्यात (५६५) हेक्टरचे नुकसान झाले.

हेही वाचा – इगतपुरी तालुक्यात दुसऱ्या दिवशीही पावसाचा तडाखा; भातशेतीचे नुकसान

जिल्ह्यात ६८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान

रविवारच्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सुमारे ६८ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात चांदवड तालुक्यातील १९४७०, निफाड १३८३२, इगतपुरी १११२१, पेठ ४८९०, दिंडोरी ३४४०, कळवण ३९०५, सटाणा ६९७, नाशिक १८९६, त्र्यंबकेश्वर ५५१, येवला ९०४, सुरगाणा ७४० इतक्या शेतकऱ्यांचा समावेश आहे.