तीन लग्न करूनही संसार टिकत नसल्याने नैराश्य आलेल्या ३३ वर्षांच्या विवाहितेने दीड वर्षाच्या मुलीला गळफास देत स्वत: आत्महत्या केली. सुनिता कराटे यांची तीन लग्न झाली. पहिल्या पतीचा मृ़त्यू झाल्यानंतर त्यांनी दुसरे आणि तिसरे लग्न केले. दुसऱ्या पतीपासून आणि नंतर तिसऱ्या पतीपासून त्यांनी फारकत घेतली आहे. तीन लग्न करुनही संसार टिकत नसल्याने आलेल्या नैराश्यातून सुनिता यांनी दीड वर्षाच्या मुलीला गळफास देत स्वत:ही गळफास घेतला. सकाळी सुनिता यांची आई त्यांच्या घरी गेली असता प्रकार लक्षात आला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2023 रोजी प्रकाशित
नाशिक : संसार टिकत नसल्याने बालिकेला गळफास देत मातेची आत्महत्या
तीन लग्न करुनही संसार टिकत नसल्याने आलेल्या नैराश्यातून सुनिता यांनी दीड वर्षाच्या मुलीला गळफास देत स्वत:ही गळफास घेतला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 16-03-2023 at 00:04 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 33 year old married woman committed suicide after killing daughter zws