नाशिक : जिल्ह्य़ात ७० हजार २७२ करोनाबाधितांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले असून सद्य:स्थितीत नऊ हजार ३०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण संख्येत २०८ ने घट झाली आहे. आतापर्यंत एक हजार ४५१ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.

जिल्ह्य़ात रुग्णांची संख्या वाढत असली तरी उपचारानंतर घरी जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढलेआहे. सध्या नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक (५५४), चांदवड (२०२), सिन्नर (८९४), दिंडोरी (२६०), निफाड (९५२), देवळा (१५७), नांदगाव (३३०), येवला (१२९), त्र्यंबकेश्वर (१७०), सुरगाणा (३८), पेठ (३५), कळवण (१७१), बागलाण (२६२), इगतपुरी (२३५), मालेगांव ग्रामीण (३३८) याप्रमाणे चार हजार ७२७ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात चार हजार ३८, मालेगाव महानगर पालिका ४२८ तर जिल्हाबाहेरील १०७  याप्रमाणे एकू ण नऊ हजार ३०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्य़ात ७० हजार २७२ रुग्ण आढळले आहेत.

दुसरीकडे, जिल्ह्य़ात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ७६.४५ टक्के, नाशिक शहरात ९१.१७, मालेगाव ८४.८० तर जिल्ह्य़ात बरे होण्याचे प्रमाण ८६.७३ इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये ४८६, नाशिक महापालिका क्षेत्रात ७७६, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १५८ आणि जिल्हाबाहेरील ३१ याप्रमाणे एकू ण एक हजार ४५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.