नाशिक – सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत आदिमा ऑरगॅनिक या रासायनिक कारखान्याला शुक्रवारी दुपारी आग लागली. कारखान्यातील रसायनांच्या टाक्यांचे स्फोट होऊन आगीने रौद्रावतार धारण केला. सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या पाच बंबांकडून केले जात होते.

या आगीत कुठलीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती मुसळगाव औद्योगिक वसाहतीचे प्रमुख नामकर्ण आवारे यांनी दिली. दुपारी चार वाजता आदिमा ऑरगॅनिक या रासायनिक कारखान्याला अकस्मात आग लागली. कारखान्यात २५ कामगार काम करतात. दुर्घटना घडली तेव्हा १० ते १२ कर्मचारी कामावर हजर असल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. आग लागल्याचे लक्षात येताच कामगारांनी बाहेर धाव घेत या घटनेची माहिती अग्निशमन दलास दिली. काही वेळात आग सर्वत्र पसरली. कारखान्यात रासायनिक पदार्थ साठवणुकीच्या टाक्या आहेत. त्यांचे स्फोट होऊ लागले. दुरवरून आगीचे लोट दिसत होते. प्रारंभी सिन्नर नगरपालिकेचे बंब दाखल झाले. परंतु, आगीची तीव्रता पाहून नाशिक महानगरपालिकेकडून मदत मागवण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Kalyan, jeans making factories, Chinchpada, Dwarli area, kdmc, resident, pollution issue
कल्याणमधील चिंचपा़डा, व्दारली येथील हरितपट्ट्यावरील जीन्सचे ३२ कारखाने जमीनदोस्त, प्रदुषणाने परिसरातील नागरिक होते त्रस्त
Gondia, Fire Breaks Out at Chemical Company, fulchur toll naka, Gondia, fire in gondia, No Casualties Reported, Significant Financial Loss, chemical company fire gondia, fire news, gondia news,
गोंदियात रासायनिक पदार्थ तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग; जीवितहानी नाही
Uran, chirner vilage, Uran taluka, Farmers did Sugarcane Cultivation, unfavorable land, unfavorable condition, 25 tonnes, konkani sugarcane, uran news, panvel news, marathi news,
उरण : चिरनेरमध्ये दीड एकरात २५ टन कोकणी उसाचे उत्पादन
thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
मुसळगाव औद्योगिक वसाहतीत रासायनिक कारखान्याला भीषण आग

हेही वाचा >>>“चारशेपेक्षा अधिक जागा कशा मिळतात ते तुम्ही बघाच”, दीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

मुसळगाव-सिन्नर मार्गावरील आदिमा ऑरगॅनिक या रसायन निर्मिती करणाऱ्या कारखान्यातील आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशमन दलाकडून युध्दपातळीवर सुरू आहे. पोलीस, महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. – दादा भुसे (पालकमंत्री, नाशिक)