नंदुरबार : उद्धव ठाकरे यांच्या टोमणे बॉम्बला काही अर्थ नाही. लोकसभेत सत्ताधाऱ्यांच्या जागा चारशेपार कशा जातात, हे उद्वव ठाकरेंना पाहावयाचे असेल तर त्यांनी अवश्य पहावे. ज्यांना चारशेपेक्षा अधिक जागा जिंकायच्या असतात, त्यांना मेहनत घ्यावी लागते. ज्या लोकांना मेहनत करायची नसते ते चारशेचे स्वप्नही पाहत नाहीत, असा टोला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हाणला.

अमळनेर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर केसकर हे हेलिकॉप्टरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत शुक्रवारी नंदुरबारमध्ये आले होते. हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरावयाचे असल्याने थोडावेळ जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देण्यासाठी केसरकर आले असता त्यांच्याशी माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांना लक्ष्य केले. आम्ही उद्धव ठाकरेंविषयी कायम चांगले बोलतो. मात्र त्यांची माणसे कुठल्या स्तरावरुन बोलतात, हे आपण पाहिले आहे. अशा माणसांना उद्धव ठाकरेंनी थांबवले पाहिजे. अडीच वर्षात ठाकरे यांनी जनतेला काहीच दिले नाही, असेही केसरकर यांनी सांगितले.

हेही वाचा : अजित पवार म्हणतात, “पाडळसरे प्रकल्पासाठी केंद्राची मदत घेऊ, कारण…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार संजय गायकवाड यांना छगन भुजबळ यांच्याविषयी काढलेल्या अनुदगाराबद्दल मुख्यमंत्री जे सांगायचे ते सांगतील. जे घडले ते योग्य असे कधीच म्हणणार नाही. भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा आदर ठेवला पाहिजे. भुजबळांनी ओबीसींसाठी अनेक वर्षांपासून लढा दिला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. कुणबी आणि त्यांचे सगेसोयरे, यांनाच ओबीसीतून आरक्षण देण्याची शासनाची भूमिका असल्याचेही केसरकर यांनी नमूद केले.