जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथील 43 वर्षीय महिलेला भरधाव रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. त्यात ती जागीच ठार झाली. शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी सांगितले की, तालुक्यातील कुसुंबा येथे संगीता पाटील या पती कैलास पाटील, सासू इंदूबाई आणि मुलगा शुभम यांच्यासह राहत होत्या. आठ दिवसांपासून कैलास पाटील हे आजारी आहेत. त्यामुळे त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे संगीता पाटील या शुक्रवारी (6 जानेवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास सासू इंदूबाई यांच्यासोबत रुग्णालयात येण्यासाठी निघाल्या होत्या.

yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
gondia Tragic Drowning Incident, Drowning Incident, Husband and Wife dead, tirora taluka, chorkhamara village, gondia news, Drowning news,
गोंदिया : तलावात बुडून पती-पत्नीचा मृत्यू
Auctions in market committees of Nashik district also stopped for fifth day
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांतील लिलाव पाचव्या दिवशीही ठप्प
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

हेही वाचा – शेतजमीन, वहिवाटीचे वाद मिटवा केवळ दोन हजार रुपयांत, शासनाची सलोखा योजना

कुसुंबा गावातून येत असताना ट्रॅक्टरच्या मागून रस्ता ओलांडताना भरधाव रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. त्यात संगीता पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. लगेच त्याच रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.