धुळे – सातपुडा पर्वत कुशीतील आदिवासी समाजाचा सर्वात महत्वपूर्ण सण असलेल्या होळीपूर्वी आठवडाभर चालणाऱ्या भोंगऱ्या बाजाराला मंगळवारपासून आंबे, सुळे गावपासून उत्साहात सुरुवात होणार आहे. होळी पूजनासाठी पूजासाहित्य खरेदीसाठी भरणाऱ्या भोंगऱ्या बाजारात आदिवासी वाद्य, आदिवासी पेहराव, नृत्याचे सांस्कृतिक दर्शनही घडते. रोजगारासाठी बाहेर गेलेले आदिवासी बांधव यानिमित्ताने स्वगृही परततात.

सातपुड्यातील आदिवासींचा होळी हा प्रमुख सण आहे. मात्र होळीपूर्वी आठवडाभर चालणारा भोंगऱ्या हाट विशेष आकर्षण ठरतो. खरेतर हा हाट होळी सणासाठी लागणारे पूजा साहित्य म्हणजेच फुटाणे, दाळ्या, कंकण, गूळ, खजूर, नारळ आदी साहित्य खरेदीसाठी असतो. स्थानिक पातळीवर रोजगार नसल्याने आदिवासी समाज वर्षभर स्थलांतरीत असतो. मात्र होळी सणासाठी सर्वजण आपापल्या घरी येतात. यामागे सर्व नातेवाईकांची भेट होणे हादेखील प्रमुख उद्देश आहे. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून ‘मेलादा’ सणाला सुरवात होते. येथे विविध वेशभूषा साकारणे, महिनाभर कडक व्रताचे पालन करणे यासाठी बावाबुद्या, कावी, रिछडा आदी पात्र करतात. भोंगऱ्या हाट शेजारील मध्य प्रदेशातही विशेष असतो.

हेही वाचा – जळगाव : अ‍ॅड. प्रवीण चव्हाण चाळीसगाव पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा – सावरकर थीम पार्कसह संग्रहालयासाठी पाच कोटींचा निधी, मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिरपूर तालुक्यातील गावांमध्ये भोंगऱ्या हाट बाजार

२८ फेब्रुवारी रोजी आंबे व सुळे, १ मार्च रोजी पनाखेड, दहिवद, कोडीद, २ मार्च बोराडी, लाकड्या हनुमान, ३ मार्च रोजी सांगवी, ४ मार्च रोजी पळासनेर, भोईटी, ५ मार्च रोजी रोहिणी, हाडाखेड या गावांमध्ये बाजार भरेल. शिरपूर तालुक्यातील गावांमध्ये मेलादा ७ मार्च चोंदीपाडा, ८ मार्च दुर्बड्या, हिगाव, ९ मार्च शेमल्या, १२ मार्च वडेल खुर्द (वरला), अशा तारखा असल्याचे बिरसा फायटर्सचे अध्यक्ष मनोज पावरा यांनी कळविले आहे.