जळगाव – शहरातील सराफ बाजारात शनिवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९९ हजार ७०४ रुपयांपर्यंत होते. सोमवारी दिवसभरात ३०९० रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोने ९६ हजार ६१४ रुपयांपर्यंत घसरले. ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला.

सराफ बाजारात अचानक तेजीचे चित्र निर्माण होऊन सोन्याचे दर तीनच दिवसात ३८१२ रुपयांनी वधारून बुधवारपर्यंत प्रतितोळा एक लाख ६३१ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. एकूण परिस्थिती लक्षात घेता सोने पुन्हा उच्चांकी पातळीवर पोहोचते की काय, अशी भीती ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, गुरूवारी ४१२ तसेच शुक्रवारी ५१५ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोने एक लाखांच्या खाली आले. शनिवारी दरात कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात न आल्याने सोन्याचे दर स्थिर राहिले. परंतु, सोमवारी सकाळी बाजार उघडताच दरात २२६६ रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने सोने ९७ हजार ४३८ रुपयांपर्यंत खाली आले. त्यात सायंकाळी पुन्हा ८२४ रुपयांची घट झाल्याने सोने ९६ हजार ६१४ रुपयांवर स्थिरावले. एकाच दिवसात सोने दरात ३०९० रुपयांची घट झाल्याने सराफ बाजारात बऱ्यापैकी वर्दळ वाढल्याचे दिसून आले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदीचे दर स्थिर

जळगावमध्ये गुरूवारी १०३० रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदी ९८ हजार ८८० रुपयांपर्यंत खाली आली होती. मात्र, शुक्रवारी दिवसभरात १०३० रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने चांदी ९९ हजार ९१० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली. शनिवारी आणि सोमवारी दरात कोणतीच वाढ अथवा घट न झाल्याने चांदीचे दर स्थिर राहिले.