आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात निर्माण झालेल्या बेबनावाने मंगळवारी थेट हाणामारीचे वळण घेतले. भाजप महिला आघाडीतर्फे आयोजित महिलांचा सत्कार सोहळा सेनेच्या महिला पदाधिकारी व शिवसैनिकांनी धुडगूस घालत उधळण्याचा प्रयत्न केला. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मराठवाडय़ाबाबत केलेल्या विधानाच्या निषेधार्थ सेनेने हे आंदोलन केले. रहाटकर यांनी आपली अखंड महाराष्ट्राची भूमिका असल्याचे सांगितले. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण यांनी विधान परिषदेत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps program sena womens leading mess in nashik
First published on: 23-03-2016 at 03:02 IST