हेमंत गोडसे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. पोलिसांनाही गुन्हेगारांचा शोध घेणे सोपे जाईल, असा विश्वास खा. हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला आहे. शहराच्या प्रभाग क्रमांक १९ मधील चेहेडी परिसरात चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा लोकार्पण सोहळा झाला. याप्रसंगी गोडसे यांनी आता गुन्हेगारीच्या पद्धतींमध्ये बदल होत असून सायबर गुन्हे वाढत असल्याचे सांगितले. देवळाली मतदारसंघात बबन घोलप यांनी गावागावांमध्ये सभामंडपांची उभारणी केल्याने या मंडपांमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे युवा पिढी सुसंस्कृत होत चालली असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिवसेना उपनेते बबन घोलप यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चेहेडी व प्रभाग १९ मधील महिलांच्या सुरक्षिततेत वाढ होऊन गुन्हेगारीला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला. आमदार योगेश घोलप यांनी स्वखर्चाने चेहेडी गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यामुळे प्रभाग भयमुक्त आणि सुरक्षित म्हणून ओळखला जाणार आहे. देवळाली मतदारसंघात एक आगळे वेगळे काम उभे केल्याने इतर लोकप्रतिनिधीपुढे एक आदर्श निर्माण झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार घोलप यांनी देवळाली मतदारसंघ हा ८० टक्के ग्रामीण भागाचा असून शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील प्रमुख गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा मानस व्यक्त केला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cctv help in reducing crime says mp hemant godse
First published on: 28-08-2017 at 00:58 IST