जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी भाजपाचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, अध्यक्षांच्या दालनातील एकनाथ खडसेंची लावलेली प्रतिमा तातडीने हटवण्यात आली.

जळगाव जिल्हा दूध संघाची निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने चांगलीच गाजली. महिनाभरापासून निवडणुकीमुळे जिल्ह्याचे वातावरण चांगलेच तापले होते. निवडणुकीत भाजप-शिंदे गटप्रणीत शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीप्रणीत सहकार पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला होता. यात भाजपाचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली होती. त्यामुळे तेच अध्यक्षपदी विराजमान होतील, असे मानले जात होते.

nashik, Congress, Shirish Kotwal as Nashik District President, Nashik District congress President, Displeasure of local bearers, Shobha Bachhav Nomination in Dhule, dhule lok sabha seat,
काँग्रेस नाशिक प्रभारी जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान

हेही वाचा- “फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान

दरम्यान, शनिवारी रात्री शेतकरी विकास पॅनलच्या नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत अपेक्षेनुसार आमदार चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आमदार चव्हाण यांनी एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यातच मंदाकिनी खडसेंविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करीत दणदणीत विजय मिळवला. शेतकरी विकास पॅनलची धुराही आमदार चव्हाण यांच्या खांद्यावर होती.

हेही वाचा- “तीन लोक तुरुंगात जाणं, हा त्यांचा विकास आहे का?”, एकनाथ खडसेंच्या टीकेला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर

दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी रविवारी सकाळी निवडप्रक्रिया राबविण्यात आली. त्यात शेतकरी विकास पॅनलचे आमदार चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, चिमणराव पाटील, संजय सावकारे, सुरेश भोळे या आमदारांसह, माजी आमदार स्मिता वाघ, अरविंद देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ, संजय पवार आदींसह संचालक मंडळाची उपस्थिती होती. दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार चव्हाण यांनी सर्वांच्या मदतीने दूध संघाला प्रगतिपथावर घेऊन जाण्याची ग्वाही दिली. या निवडीनंतर अध्यक्षांच्या दालनातील एकनाथ खडसेंची लावलेली प्रतिमा तातडीने हटवण्यात आली.