शहर व परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले असून भद्रकाली तसेच आडगाव ठाण्याच्या हद्दीत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली. भद्रकाली ठाण्याच्या परिसरात पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. मोटार सायकल, मोबाईल, घडय़ाळ याप्रमाणे एकूण ४४ हजार ३०० रूपयांचा माल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.
तसेच आडगाव ठाण्याच्या हद्दीत तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोटार सायकल, वेगवेगळ्या किंमतीचे मोबाईल, दोन पर्स असा एकूण ९५ हजार ९५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.