scorecardresearch

वाळूची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर ताब्यात

तालुक्यातील लोहोणेर-माळवाडी रस्त्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले.

वाळूची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर ताब्यात
देवळा पोलिसांनी जप्त केलेले अवैधरित्या वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर (छाया – महेश सोनकुळे)

देवळा : तालुक्यातील लोहोणेर-माळवाडी रस्त्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईने परिसरातील वाळू तस्करी उघड होत आहे.

सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जातात. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर लोहणेर-माळवाडी रस्त्यावर पोलिसांकडून सापळा रचण्यात आला. पहाटे दोन ते तीन वाजेच्या दरम्यान चार ट्रॅक्टर वाळूची अवैधरित्या वाहतूक करताना पकडण्यात आले. हे तीनही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आले.

हेही वाचा >>> मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड मोर्चा

तपासणीत चालकाकडे वाहतुकीचा परवाना नसल्याचे आढळले. ट्रॅक्टर मालक आणि चालकाची माहिती घेतली गेली. या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित ट्रॅक्टर मालकांना सहा लाख रुपयांचा दंड होणार असल्याची माहिती शिरसाठ यांनी दिली. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार देवळा पोलिसांनी तालुक्यातील अवैद्य धंद्यांविरोधात मोहीम राबविली आहे. वाळू तस्करांविरोधात सातत्याने कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 14:07 IST

संबंधित बातम्या