नाशिक : शहरातील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे रौप्य महोत्सवी वर्षातील गिरणा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, यंदाच्या पुरस्कारार्थींमध्ये ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. चित्रपट दिग्दर्शक मंगेश हडवळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्यासह ११ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

हेही वाचा – धुळे : अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी धुळ्यात मोर्चा

हेही वाचा – जळगावात उद्या जिल्हा विकास परिषद ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरात पाच एप्रिल रोजी या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती गिरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली. अहिराणी भाषेचा गाण्यांव्दारे प्रचार व प्रसार करणारे गायक तथा गीतकार सचिन कुमावत (जामनेर,जळगाव), साने गुरुजी शिक्षण संस्थेचे प्रवीण जोशी (नाशिक), नाशिक कवीचे अध्यक्ष बाळासाहेब मगर (नाशिक), शिवाजी दहिते (धुळे), ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे (दिंडोरी), महिलांसाठी योगदान देणाऱ्या स्वाती भामरे (नाशिक), शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे प्राचार्य डॉ. सुभाष भालेराव (येवला), भारतातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा सूवर्णा जगताप (लासलगाव) यांचाही पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. प्रकाश होळकर, दिलीप पाटील, राजेंद्र निकम, प्रा. शंकर बोऱ्हाडे, रवींद्र मालुंजकर, शिवाजी जाधव, प्रल्हाद ठाकरे, संजय फतनानी यांच्या समितीने पुरस्कारार्थींची निवड केली