कळवण तालुक्यातील वेरूळे येथील वृध्द दाम्पत्याच्या खूनाचा उलगडा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या तीन तासात केला. आजी, आजोबांकडून खर्चाला पैसे दिले जात नाही, नातवंडांमध्ये भेदभाव केला जातो, याचा राग मनात ठेवत नातवानेच आजी, आजोबांचा खून केला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी २७ वर्षाच्या संशयिताला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा >>> जळगाव : एकनाथ खडसेंनी दूध संघाच्या निवडणुकीत निवडून दाखवावे; गिरीश महाजन यांचे आव्हान

कळवण तालुक्यातील वेरुळे गावच्या उंबरदरे पाड्यात मोहन कोल्हे आणि त्यांची पत्नी सखुबाई यांचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उपलब्ध परिस्थितीजन्य पुरावे, तांत्रिक विश्लेषण आणि श्वान पथकाच्या मदतीने काही माहिती मिळाली. त्यानुसार कोल्हे दाम्पत्याचा नातू राजकुमार कोल्हे (२७, रा. वरखेडा शिवार) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेळोवेळी खर्चाला पैसे देत नाहीत, सातत्याने भेदभाव करतात, याचा राग मनात धरत त्याने आजी-आजोबांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. अभोणा पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून अवघ्या तीन तासात खुनाचा उलगडा केल्याने तपासी पथकाला जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.