धुळे – वेगवेगळ्या कारणांमुळे संवेदनशील झालेल्या शहरात गावठी बंदूक आणि दोन जिवंत काडतूसे घेऊन फिरणाऱ्या तरुणाविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्याकडून सुमारे २७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

हेही वाचा – धुळे : व्यापाऱ्याला दाम्पत्याचा ४० लाख रुपयांना गंडा

मुजाहिद अहमद (३३, रा. देविका मल्ला, आदम नगर, मालेगाव) हा गावठी बंदूक विक्रीच्या उद्देशाने धुळे तालुक्यातील आर्वी येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी गावालगत असलेल्या लकी स्टार हॉटेलजवळ पोलिसांनी सापळा रचून मुजाहिदला ताब्यात घेतले. अंगझडतीत २५ हजार रुपयांची गावठी बंदूक आणि दोन हजार रुपयांचे दोन जिवंत काडतूस असा २७ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.