जळगाव महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्तपदाचा तिढा निर्माण झाला आहे. आयुक्तांच्या खुर्चीवर दावा कुणाचा, याचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे. आयुक्तपदी कोण असणार, याबाबतचा निर्णय पाच जानेवारी रोजी औरंगाबाद येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) होणार होता. मात्र, आता ही सुनावणी सोमवारी होणार आहे.

हेही वाचा- धुळे : थंडीमुळे शाळांच्या वेळा बदलण्याची युवासेनेचे मागणी

State Tax Inspector Exam Final Result declared by MPSC
राज्य कर निरीक्षक परीक्षेचा अंतिम निकाल एमपीएससीकडून जाहीर
mhada lottery pune , mhada pune marathi news
खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
Don Arun Gawali
मोठी बातमी! कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा येणार बाहेर, लोकसभेला मतदान करणार?
Bhavana Gawali
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?

शासनाने डिसेंबर २०२२ मध्ये महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या जागी परभणी येथून आलेले देविदास पवार यांना नियुक्त केले होते. त्यांनीही महापालिकेची तात्काळ सूत्रे हाती घेतली होती. आयुक्तपदाचा निर्णय पाच जानेवारीपर्यंत लांबणीवर पडला होता. आयुक्त पवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यावर बाजू मांडण्यासाठी डॉ. गायकवाड यांनी मुदत मागितली होती. आयुक्त पवारांना धोरणात्मक व आर्थिक निर्णय घेता येणार नाहीत. मात्र, प्रशासकीय कामकाज व फायलींचा निपटारा त्यांना करता येणार होता.

हेही वाचा- जळगाव : रुग्णवाहिकेच्या धडकेत कुसुंब्यातील महिला ठार

आयुक्त पवारांकडून सादर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रावर डॉ. गायकवाड यांच्या वतीने उलटतपासणीसाठी मुदत मागण्यात होती. त्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात पाच जानेवारी रोजी कामकाज ठेवण्यात आले होते. कार्यकाळ पूर्ण झाला नाही आणि कोणतेही सबळ कारण न देता अचानक बदली झाली कशी, म्हणून या बदलीविरोधात डॉ. गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) याचिका दाखल केली होती. यावर आतापर्यंत दोन वेळा सुनावणी झाली. तिसरी सुनावणी पाच जानेवारी रोजी होती. मात्र, ही सुनावणी आता नऊ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.