scorecardresearch

नवी मुंबई : परदेश वारी पडली महागात, चोरट्यांनी घर केले साफ, चार लाख २० हजारांचे दागिने लंपास  

वाशीत घरफोडी झाली आहे. घरातील साडेचार लाखांचे दागिने चोरी झाल्याचे समोर आले आहे. घरात राहणारे कुटुंब लंडन येथे फिरावयास गेले होते. मात्र, परतल्यावर घराचे दरवाजे उघडे आणि आतील सर्व सामान अस्ताव्यस्त आढळून आले.

नवी मुंबई : परदेश वारी पडली महागात, चोरट्यांनी घर केले साफ, चार लाख २० हजारांचे दागिने लंपास  
प्रातिनिधिक छायाचित्र

नवी मुंबई  : वाशीत राहणारे एक कुटुंब लंडन येथे फिरावयास गेले होते. मात्र, परतल्यावर घराचे दरवाजे उघडे आणि आतील सर्व सामान अस्ताव्यस्त आढळून आले. घरातील साडेचार लाखांचे दागिने चोरी झाल्याचे समोर आले असून, या बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपना शर्मा असे फिर्यादीचे नाव आहे.  

आई, पती आणि एक मुलगा असे हे कुटुंब वाशी सेक्टर सात येथील एका रो हाऊसमध्ये राहते. त्यांच्या घरी चोवीस तास काम करणारी महिलाही आहे. मात्र, या सर्वांना लंडन येथे जायचे असल्याने काम करणाऱ्या महिलेस सुट्टी देण्यात आली. २३ डिसेंबरला ते सहकुटुंब लंडन येथे गेले होते. ४ जानेवारीला सकाळी साडेनऊच्या सुमारास घरी आले. रो हाऊसचे मुख्य प्रवेशद्वार, आतील दरवाजा उघडा होता व कडी कोयंडे तोडलेले होते.

हेही वाचा – पुणे : गजा मारणे टोळीतील गुंड पप्पू कुडलेकडून एकाला जीवे मारण्याची धमकी

आत जाऊन पहिले तर सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले होते. याशिवाय ठेवलेल्या दागिण्यांची पाहणी केली असता सर्व चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यात अंगठ्या, सोनसाखळ्या हिऱ्याचे दागिने आदी एकूण १३ नग चोरीला गेले होते. त्यांचे मुल्य चार लाख २० हजार ५०० रुपये आहे. या बाबत वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 17:12 IST

संबंधित बातम्या