धुळे : फेसबुकवर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी केल्याप्रकरणी डॉ. संजय पिंगळे यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, स्वतःला भाजप कार्यकर्ते म्हणवून घेत काहींनी रात्री डॉ. पिंगळे यांना शिवीगाळ करीत त्यांच्या कारची तोडफोड केली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड अनुराधाताई मालुसरे यांचे निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष प्रवीण अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सहा सप्टेंबर रोजी दुपारी चार ते साडेचार या वेळेत धुळे शहरातील डॉ. संजय पिंगळे यांच्या फेसबुक खात्यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकलेला दिसला. त्यामुळे महाजन यांची बदनामी झाली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पिंगळेविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, भाजपच्या काही समर्थकांनी पिंगळे यांना शिवीगाळ करीत त्यांच्या कारची तोडफोड केली. याप्रकरणी पिंगळे यांच्या पत्नी निता पिंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सात जणांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.