लोकसत्ता टीम

मालेगाव : जेसीबी यंत्राखाली सापडून तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर जाग आलेल्या महापालिकेने येथील कुसुंबा रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा चालवला आहे. या कारवाईत पालिका पथकाने ५० हून अधिक अतिक्रमणे हटविली असून पुन्हा अतिक्रमण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी दिला आहे.

24 tree fall due to unseasonal rain in pimpri chinchwad
पिंपरी : अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे २४ ठिकाणी झाडपडीच्या घटना
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली
Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी

हेही वाचा… नाशिक: शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी मुंबई पोलिसांची मदत; ५० अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

शहरातील अनेक मुख्य रस्त्यांना अतिक्रमणांचा विळखा पडल्याने रहदारीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. शहरातील काही रस्ते रुंद असले तरी रस्त्याच्या दुतर्फा होत असलेल्या अतिक्रमणांमुळे रस्ते अरुंद वाटू लागले आहेत. रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे अनेक समस्या उदभवत आहेत. शहरातील कायदा सुव्यवस्थेलाही त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. शहरातील अशा अतिक्रमणांविरुद्ध महापालिकेतर्फे वेळोवेळी मोहीम राबवली जात असली तरी दोन-चार दिवसांनी संबंधित अतिक्रमणधारक पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण करीत असतात. परिणामी, वाढते अतिक्रमणे ही शहरातील एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वी अशाच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या कुसूंबा रस्त्यावर पायी जाणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुरडीचा जेसीबी यंत्राखाली सापडून मृत्यू झाला. त्यामुळे स्थानिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांच्या मदतीने महापालिकेने या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी धडक कारवाई सुरु केली.

हेही वाचा… नाशिक: पेठ तालुक्यातील अपघातात दोन जणांचा मृत्यू – २५ प्रवासी जखमी

नवीन बस स्थानक ते करीम नाक्यापर्यंत रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली. अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त सतीश दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त सुनील खडके यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण अधीक्षक शाम कांबळे यांच्या पथकाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. आयेशानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास देवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर…

अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होत असल्याचा यापूर्वीचा अनुभव गाठीशी असल्याने यापुढे तसे होऊ नये आणि रस्ता कायम अतिक्रमणमुक्त राहावा, यासाठी महापालिका प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येणार आहे. अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी सकाळ, सायंकाळ असे दिवसातून दोन वेळा संबंधित ठिकाणांची स्थळ पाहणी करुन अतिक्रमण होऊ नये, याकडे बारीक लक्ष ठेवणार आहेत. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण झाल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला आहे. कारवाई टाळण्यासाठी शहरातील अतिक्रमणधारकांनी स्वतःहुन आपले अतिक्रमण काढून घ्यावे, असे आवाहनही आयुक्त गोसावी यांनी केले आहे. मालेगावकरांकडून पालिकेच्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे.