नाशिक : सिन्नर तालुक्यातील वावी येथे दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयितांना पुढील तपासासाठी वावी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वावी येथील मयुरेश काळे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा दुपारच्या सुमारास काढून चोरांनी रोख रक्कम , दागिने लंपास केले. या गुन्ह्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला काही माहिती मिळाली. तांत्रिक तपास करुन सुनील म्हस्के (३१, साबरवाडी), चांगदेव देवडे (३५, बदापूर), कैलास मढवई (३४, चिंचोडी), अक्रम शेख (३१, विंचुर रोड), जीवन कोल्हे (२६, हडप सावरगाव), अलका जेजूरकर (४८, येवला) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चोरलेल्या रोख रकमेतील १४ लाख सात हजार रुपये, चोरीस गेलेले दागिने, चोरीच्या पैशांंतून खरेदी केलेला भ्रमणध्वनी, गुन्ह्यात वापरलेले वाहन असा २५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

हेही वाचा : “भाजप जळगावमध्ये उमेदवार बदलणार”, संजय सावंत यांचा दावा

nashik stone pelting marathi news, nashik violence marathi news
नाशिकमध्ये समाजमाध्यमातील वादग्रस्त संदेशामुळे जमावाकडून दगडफेक
nashik lok sabha,
नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”

तक्रारदार काळे आणि अलका जेजूरकर यांची ओळख होती. जेजूरकरला काळे यांच्याकडे असणारे पैसे आणि अन्य मुद्देमालाची माहिती होती. गुन्हा घडला त्या दिवशी संशयितांपैकी दोघांनी काळे यांना शिर्डी येथे खरेदीसाठी नेले. तसेच इतर संशयितांनी काळे यांच्या घराची टेहेळणी करुन घरफोडी करत रोख रक्कम व देवीच्या अंगावरील सोन्याची दागिने लंपास केले. संशयितांना वावी पोलीस ठाण्याकडे चौकशीसाठी ताब्यात देण्यात आले आहे.