नाशिक : शहरात गंगापूररोडवर सोमेश्वरजवळ सोमवारी दुपारनंतर झालेल्या अपघातात पंचवटीतील अमृतधाम परिसरातील ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू झाला. अपघातास कारणीभूत मोटार चालकाला गंगापूररोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमेश्वरजवळील गंगापूर रोडवर सोमवारी सुरेश वाखारकर आणि विद्या वाखारकर (मूळ रा. नागपूर, हल्ली मुक्काम शारदा सोसायटी, लक्ष्मीनगर, बाफणा बाजारमागे, अमृतधाम, पंचवटी) हे दाम्पत्य दुचाकीने जात असताना समोरून चारचाकी वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील वाखारकर दाम्पत्य दूरवर फेकले गेले.

हेही वाचा : नाशिक : अमृतधाम परिसरात युवकाच्या हत्येमुळे तणाव, जमावाकडून वाहनांची तोडफोड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातात सुरेश वाखारकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर विद्या वाखारकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांचाही मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी महिला वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गंगापूर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.