राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं असून रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे येत असताना हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं बसून आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली.

हेही वाचा – “…तरी उद्धव ठाकरे गप्प का आहेत?” शिंदे गटाचा सवाल; म्हणे, “…हे पक्षासाठी घातक आहे!”

Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!
In Raigad farmers will not be treated unfairly says Uday Samant
रायगडमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय होणारा निर्णय घेणार नाही, उरणमधील महायुतीच्या सभेत पालकमंत्र्यांची ग्वाही
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

काय म्हणाले संजय राऊत?

“काही दिवसांपूर्वी आम्ही नागपूरमध्ये होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही तिथे उपस्थित होते. सरकारचा गोंधळ आम्हाला जवळून बघता आला. मुळात हे सरकार अस्तित्वातच नाहीये. रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येत आहेत. मात्र, सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूखंडाची दोन प्रकरणे, त्यानंतर अब्दुल सत्तार यांचा जमीन घोटाळा, उदय सामंत बोगस डिग्री प्रकरण, अशी प्रकरणं बाहेर येऊनही सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं होतं. जणू काही घडलंच नाही आणि विरोधी पक्षच गुन्हेगार आहे, अशा पद्धतीने काम करत होतं”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा – “…तेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांना चपलाने मारतील”, नारायण राणेंचा गंभीर आरोप

“महाराष्ट्राला इतिहास आहे. पूर्वी एखाद्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यांवर न्यायालयाने थोडे जरी ताशेरे ओढले, तरी ते राजीनामा देत होते. बॅरिस्टर अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशी अनेक उदाहरणं आहेत. मात्र, एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आली. तेही पुराव्यासह तरीही सरकार ठंब्याप्रमाणे बसून आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “…तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू यायचे”, संभाजीराजे छत्रपतींचं वडिलांना भावनिक पत्र, म्हणाले, “बाबा मला…”

“हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही”

“महाराष्ट्रातील राजकीय वातावरण हे परिवर्तनाच्या दिशेने चालले आहे. २०२४ किंवा त्यापूर्वीसुद्धा हे परिवर्तन होऊ शकते. हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, हे मी यापूर्वी सुद्धा सांगितलं आहे. न्यायालयावर जर दबाव आला नाही, तर संविधान आणि कायद्याचे उल्लंघन करून आलेलं हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही. कायद्यानुसार १६ आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे सरकारकडून वेळकाढू धोरण रावबलं जात आहे. हे सरकार व्हेंटिलेटरवर आहे, ते एका सर्वोच्च न्यायालयाने काढलं तर ‘हे राम’ नक्की आहे”, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

“नारायण राणेंना मी कधीही भेटलो नाही”

दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना भेटून संजय राऊतांबद्दल माहिती देईन, अशी प्रतिक्रिया दिली होती. यासंदर्भातही संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “राणेंनी पक्ष सोडल्यानंतर मी कधीही त्यांना भेटलो नाही. मी बेईमान गद्दारांना भेटत नाही, त्यांचं तोंडही मी बघत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा झाली हे चांगलं लक्षण आहे, असं ते म्हणाले. खरं तर या वादाची सुरूवात नारायण राणेंनी केली. त्यांनी ठाकरे कुटुंबियांवर घाणेरडे आरोप केले. त्यामुळे धमक्या दादागिरीच्या गोष्टी करू नका, आमचं आयुष्य रस्त्यावर गेलं आहे”, असे ते म्हणाले.