नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड म्यॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) विश्वस्त पदासाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ४० इच्छुकांच्या मुलाखती नववर्षात दोन ते चार जानेवारी या कालावधीत होणार आहेत. पदाधिकाऱ्यांमधील मतभेदामुळे ठप्प असणारे निमा संस्थेचे काम नव्या वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नाशिक : थकबाकी वसुलीसाठी मनपाकडून मालमत्ता जप्तीची तयारी

या मुलाखतीचा कार्यक्रम धर्मादाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांनी जाहीर केला. सुमारे दोन वर्षांपासून निमाचे काम ठप्प आहे. धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने संस्थेवर प्रशासक मंडळ नेमले. निमा विश्वस्त पदासाठी इच्छुकांमधून सर्वसहमतीने सात नावे सुचविण्याचा पर्याय दिला गेला होता. तथापि, गटातटाच्या राजकारणामुळे या नावांवर एकमत झाले नाही. सर्व गटांनी परस्परांची उणीदुणी काढण्यात धन्यता मानली होती. नावांवर एकमत होत नसल्याने अखेर धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने विश्वस्त नेमणुकीसाठी मुलाखतीची प्रक्रिया सुरू केली आहे. निमा संस्थेच्या न्यासाच्या विश्वस्त पद मुलाखतीसाठी विहित मुदतीत एकूण ४० उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यात सर्व गटांच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा- जयंत पाटील यांच्या निलंबन निषेधार्थ जळगावात राष्ट्रवादीचे आंदोलन

इच्छुकांच्या यादीत अभय कुलकर्णी, शशिकांत जाधव, मंगेश पाटणकर, धनंजय बेळे या माजी अध्यक्षांसह यापूर्वी निमात वेगवेगळ्या पदांची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनेकांचा समावेश आहे. दोन जानेवारी रोजी दुपारी दोन ते सायंकाळी सहा या कालावधीत १५ उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पार पडणार आहे. तीन जानेवारी रोजी उपरोक्त काळात पुढील १५ उमेदवारांची मुलाखत होईल. तर चार जानेवारी रोजी उर्वरित १० उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. दैनंदिन न्यायिक कामकाजावर कुठलाही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन दुपार ते संध्याकाळची वेळ निश्चित करण्यात आल्याचे धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाने म्हटले आहे.

हेही वााच- ठाकरे गटाला धक्का; हकालपट्टीनंतर काही तासांत भाऊ चौधरींचा शिंदे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य!

मुलाखत प्रक्रियेतून सात जणांची निवड केली जाणार आहे. विश्वस्तांच्या माध्यमातून का होईना दोन वर्षांपासून ठप्प असलेले संस्थेचे काम सुरू होईल. निमा निवडणूक प्रक्रियेचा मार्ग या माध्यमातून प्रशस्त होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interviews in the new year for the position of trustee of nashik industries and manufacturers association nima nashik dpj
First published on: 22-12-2022 at 23:08 IST