जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसेवाटप झाल्याचे चर्चितचर्वण झाले असताना यावल तालुक्यातील भालोद येथे रविवारी सकाळी दूध सहकारी सोसायटीच्या संचालकांमध्ये दूध संघातील निवडणुकीतील पैशांसंदर्भातील वाद चव्हाट्यावर आला. भालोदच्या वादातून दूध संघ निवडणुकीत पैशांचा बेसुमार वापर झाल्याचे उघड होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला. तर, पैसे वाटपाचा प्रश्नच येत नसल्याो ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> नाशिक : युवकाच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलीस कोठडी

Speculation markets, Bhandara-Gondia, polls,
मतदानानंतर सट्टा बाजार तेजीत, भंडारा-गोंदियात उमेदवारांना किती मिळतोय भाव, जाणून घ्या….
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
Akola Lok Sabha, vote division in Akola,
अकोल्यात मतविभाजन कोणाला फायदेशीर ठरणार ?
During the Lok Sabha elections under all the six major parties in the Maharashtra state
सर्वपक्षीय खदखद! प्रमुख सहा पक्षांमध्ये उमेदवारीवरून नाराजीनाट्य, अनेक मतदारसंघांत बंडखोरी

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दोन्ही पॅनलकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाल्याची चर्चा रंगली होती. रविवारी सकाळी हा वाद चव्हाट्यावर आला. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी भालोद येथील दूध उत्पादक सहकारी संस्थेतर्फे दिलीप चौधरी यांच्या नावाने मतदानाचा ठराव करण्यात आला होता. ठराव करताना मतदानासाठी जे काही पाकीट येईल, त्यातील हिस्सा दूध उत्पादकांना देण्यात येईल, असे ठरविण्यात आले होते, अशी चर्चा आहे. मतदान होऊन अनेक दिवस उलटूनही हिस्सा न मिळाल्याने रविवारी दूध उत्पादकांनी थेट गावातील दूध सोसायटी कार्यालयासमोरच दिलीप चौधरी यांना विचारणा केली. यावर चौधरी यांनी आपण एक पैसाही घेतला नसल्याचे सांगत, भाजपच्या उमेदवारांना मतदान केल्याचा दावा केला. दूध सोसायटीच्या इतर संचालकांचा त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास बसला नाही. यामुळे ही शाब्दिक चकमक हमरीतुमरीवर आली.

हेही वाचा >>> पारोळ्यातील बनावट देशी मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; नाशिक विभागीय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचा छापा

भालोद येथे रविवारी विविध कार्यकारी सोसायटी व दूध उत्पादक सोसायटीच्या संचालकांची सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. सांगवी रस्त्यावरील विविध कार्यकारी सोसायटीच्या जागेवर तोलकाटा बसविण्यासंदर्भातील विषय होता. तोलकाटा बसविण्यासाठी १५ ते १६ लाख खर्च येणार होता. दूध संघ निवडणुकीसाठी मिळालेले पाकीट संस्थेत जमा करावे, असा संचालकांचा आग्रह होता. निवडणुकीत दोन्ही पॅनलकडून पैसे घेण्यात आले होते, अशी चर्चा आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर केला गेल्याचे सिध्द झाल्याचा आरोप केला. निवडणुकीत मतदारांना पैशांची देवाणघेवाण करण्यात आली, प्रलोभन देण्याचा प्रयत्न झाल्याचे भालोद येथील दूध सोसायटीच्या संचालकांतील वादातून दिसते. पैशांच्या विषयावरून संचालकांमध्ये वाद झाला, हे यामधून सिद्ध झाले आहे. पैसे दिल्याची भावना भालोद येथील दूध सोसायटीच्या संचालकांमध्ये आहे. दूध संघ निवडणुकीत पैशांची वारेमाप उधळण झाली, हे अधोरेखित झाले असल्याचे खडसे यांनी नमूद केले. दुसरीकडे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आम्ही कुणाला पैसे वाटले नसल्याचा दावा केला. या गोष्टी निराधार आहेत. आम्ही पैसे पाठविलेच नाहीत. पैशांचा विषय कुठून आला, हेच समजत नाही, असे त्यांनी नमूद केले.