नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार कादंबरीकर, लेखिका आशा बगे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १० मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.

या पुरस्काराची घोषणा प्रतिष्ठानचे हेमंत टकले, ॲड. विलास लोणारी, लोकेश शेवडे, मकरंद हिंगणे, प्रकाश होळकर आदी पदाधिकाऱ्यांनी केली. प्रतिष्ठानतर्फे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिकास दर दोन वर्षांतून एकदा जनस्थान पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे त्याचे स्वरूप आहे. आशा बगे यांचे बालपण नागपूर येथे गेले. मराठी साहित्य आणि संगितात त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. संसार सांभाळून त्यांनी लेखनाचा छंद जोपासला. लेखनाची सुरुवात ‘सत्यकथे’पासून झाली. त्यांची गाजलेली कथा ‘रुक्मिणी’ १९८० साली प्रसिद्ध झाली. मौजचे श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांनी त्यांच्या लेखन शैलीला आकार दिला. नंतर मौज आणि बगे असे समीकरण जुळले.

tractor queen mallika srinivasan woman entrepreneur
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘ट्रॅक्टर क्वीन’ कोण? जाणून घ्या भारतातील सर्वांत श्रीमंत महिला उद्योजकाची माहिती….
dilshad mujawar
दिलशाद मुजावर यांना ‘अरुणोदय ‘ पुरस्कार मरणोत्तर जाहीर
Honoring Vijay Manthanwar with Principal Bhausaheb Deshmukh Smriti Sant Sevak Award
प्राचार्य भाऊसाहेब देशमुख स्मृती ‘संतसेवक’ पुरस्काराने विजय मंथनवार यांचा सन्मान
govind dev giri maharaj latest marathi news
स्वामी गोविंददेवगिरी महाराजांना रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार; नाशिकमध्ये नागरी सत्कार, गंगा गोदावरीची महाआरती
Bharat Ratna, Yashwantrao Chavan,
सातारा : यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, उदयनराजे करणार मोदींकडे शिफारस
Mohan Wagh Award for Best Theatre Production for Chinmay Mandlekar Ghalib Drama
“महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांच्या DNA मध्ये तीन नावं, एक असतं मंगेशकर…”, चिन्मय मांडलेकरचं विधान
ashok saraf won master dinanath mangeshkar award
“एका असामान्य परिवाराकडून…”, पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले…
Djokovic recipient of the Bonmati Laureate Award sport news
जोकोविच, बोनमती लॉरेओ पुरस्काराचे मानकरी

हेही वाचा –

मौजच्या दिवाळी अंकात नेमाने लेखन करणाऱ्या बगे यांचा २०१८ सालापर्यंतचा प्रकाशित ग्रंथसंभार १३ लघुकथासंग्रह, सात कादंबऱ्या, ललित लेखांची दोन पुस्तके असा व्यापक आहे. विदर्भ साहित्य संघाच्या पहिल्या लेखिका संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. संगिताची विशेष आवड असणाऱ्या आशाताईंनी त्यावर अनेकदा लिहिलेले आहे. त्यांचे आयुष्य एकत्रित कुटुंबात गेले. त्यामुळे असेल, पण अशा कुटुंबांत होणारी स्त्रियांची घुसमट अनेक कथांमधून त्यांनी समर्थपणे मांडली. पुरस्कार निवड समितीत डॉ. अनुपमा उजगरे, संध्या नरे-पवार, प्रफुल्ल शिलेदार, डॉ. सदानंद बोरसे आणि अविनाश सप्रे यांचा समावेश होता.

हेही वाचा –

साहित्य संपदा

अनंत, ऑर्गन, ऋुतूवेगळे, चंदन, जलसाघर, दर्पण, निसटलेले, पाऊल वाटेवरचे गाव मारवा आदी कथासंग्रह तर प्रतिद्वंद्वी, भूमी, मुद्रा, सेतू या कादंबऱ्याचे लेखन आशा बगे यांनी केले आहे. ‘भूमी’ ला साहित्य अकादमीचा तर ‘दर्पण’ला केशवराव कोठावळे पुरस्कार मिळाला आहे. मालतीबाई दांडेकर पुरस्कार तसेच राम शेवाळकर यांच्या नावाच्या (पहिला) साहित्यव्रती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानकडून देण्यात आली.