नाशिक – सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडीत मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या मांजरीसह विहिरीत पडला. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे, पाण्यात बुडू नये, यासाठी लोखंडी गजांचा आधार बिबट्याने घेतला असताना मांजरीनेही काही वेळ पोहून, तर काही वेळ गजांचा आधार घेऊन जीव वाचविला.

हेही वाचा – नाशिक : युवारंग युवक महोत्सवात मू.जे. महाविद्यालय विजेते

हेही वाचा – नाशिक : आधार आश्रमातील आशी अमेरिकन पालकांच्या कुशीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेंभूरवाडी येथील अण्णासाहेब सांगळे यांच्या शेताजवळ मंगळवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने मांजरीचा पाठलाग सुरू केला. मांजरीला पकडण्याच्या नादात दोघे विहिरीत पडले. पाण्यात पडल्यावर बिबट्याने विहिरीत कृषिपंप मोटारीसाठी लावलेल्या लोखंडी गजांचा आधार घेतला. मांजरही काही वेळा अगदी बिबट्याच्या अंगावर चढली, काही वेळ त्याच्या शेपटीशीही खेळली, तरी त्याने तिला काहीच केले नाही. सकाळी विहिरीतून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आल्याने ग्रामस्थांनी विहिरीत डोकावले असता मांजर आणि बिबट्या पडल्याचे दिसले. ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिल्यावर पथकाने दाखल होत दोघांची सुटका केली.