नाशिक-सिन्नर महामार्गाच्या दुर्दशेमुळे अपघातांमध्ये वाढ

नाशिक – नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर फाटा  ते सिन्नपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर अपघातांमध्ये वाढ झाली आहे. रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ नाशिक- सिन्नर टोलवेज कंपनीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे शहरध्यक्ष अकुंश पवार व तालुकाध्यक्ष सुनिल गायधनी याच्यां नेतृत्वाखाली िशदे टोल नाक्यावर वाहनधारकांसाठी टोल मुक्त आंदोलन करण्यात आले. मराठी भाषिकांना नोकरीत सामावून रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा आठ दिवसांत कोणतीही कारवाई न झाल्यास टोल फोड आंदोलन  करण्याचा इशारा मनसेने दिला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच नाशिक दौऱ्यावर येणार असल्याने िशदे, पळसे पंचक्रोशीतील शिष्टमंडळ टोल व्यवस्थापनाच्या गलथानपणाविषयी त्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. अनेक दिवसांपासुन नाशिकरोड- सिन्नर फाटा ते चेहेडीपर्यंत रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे. असे असतांना दुसरीकडे टोल वसुली केली जात आहे. चेहेडी ते िशदे या दरम्यानच्या रस्त्यावर आजपर्यत अनेकांचे अपघात झाले आहेत. अशा परिस्थितीतही टोल प्रशासन ढिम्म बसून आहे. जून किती लोकांचे जीव घेणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांनी देखील िशदे टोल संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांनीजिल्ह्यातील टोल वसुली तसेच रस्ता नादुरुस्तीमुळे होणारे अपघात यासंदर्भात शासन दरबारी आवाज उठविण्याची गरज आहे. रस्त्याची चाळणी झाली असतानां केवळ मुरुम टाकून खड्डे बुजवून आंदोलनकर्ते आणि वाहनधारकांची समजूत काढली जाते. लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. टोल प्रशासनाने अपघातग्रस्त कुटूंबाला आर्थिक मदतीचा हातीचा हात देणे गरजेचे असल्याचे मनसे आंदोलकांनी टोल व्यवस्थापक दीपक वैद्य यांना सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns toll freedom movement at shinde naka ssh
First published on: 17-09-2021 at 01:34 IST