नाशिक : केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना त्यांच्या कार्यक्षमतेमुळे स्थान मिळाले आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले. राणे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने सेना-भाजप युतीची शक्यता मावळली काय, यावर त्यांनी वेगवेगळ्या चर्चा होत असतात, चर्चांवर कुठलेही निर्णय होत नाहीत, असे सांगितले.

गुरुवारी मनपाच्या शहर बस सेवेचे फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यातील भूखंड खरेदी व्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करीत खडसे यांनाही चौकशीसाठी सूचना दिली आहे. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी आपण ईडीचे प्रवक्ते नसल्याचे स्पष्ट केले.