Nashik Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाची चांगलीच चर्चा होत आहे. या जागेसाठी महाविकास आघाडी तसेच भाजपा नेमका कोणत्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यासाठी भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये ठाण मांडले आहे. त्यांनी भाजपा पक्षातील सर्व अपक्ष उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे. असे असतानाच नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपा कोणाला पाठिंबा देणार यावर बोलताना गिरीश महाजन यांनी सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा >>> Sudhir Tambe Suspension : सुधीर तांबेंच्या निलंबनावर नाना पटोलेंची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले, “हायकमांडने…”

mla babula chowdhary
New challenge for BJP: भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात आमदाराने मुलाला उतरवले निवडणूक रिंगणात
abhijeet bichukale and udayanraje bhosale
साताऱ्यात उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले रिंगणात; उमेदवारी अर्जाबाबत म्हणाले, “मी एकटा…”
telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन
Prataprao Jadhav
बुलढाणा : राजकीय स्थित्यंतराचा असाही नमुना, एकेकाळी लढले एकमेकांविरोधात अन् आता…

देवेंद्र फडणवीस यांनाच तो अधिकार

“आम्ही अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यास सांगत आहोत. मात्र ही माघार नेमकी कोणासाठी आहे, हे अद्याप मलाही समजलेले नाही. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात ते पाहावे लागेल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी मला जसे सांगितले तसेच मी केले. सत्यजित तांबे यांना आम्हाला पाठिंब्यासाठी मागणी केली आणि भाजपाकडून त्यांना हिरवा कंदील मिळाला तर ते आमचे उमेदवार असतील,” असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Urfi Javed Dress : उर्फी जावेद वादावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी…”

…त्यामुळे आमच्यासाठी त्यांचा मुद्दा संपला

“मात्र आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा देऊ तो मोठ्या मताधिक्याने निवडणून येणार. त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. शुभांगी पाटील यांनी भाजपात १५ दिवसांपूर्वी प्रवेश केला होता. त्यावेळी आम्ही त्यांना तुमचा विचार करू असे सांगितले होते. कोणी तिकीट मागायला आल्यावर तुमचा विचार होणार नाही, असे कोणीही सांगत नसतं. भाजपा पक्षात मलाच सर्व अधिकार आहेत, असे नाही. म्हणूनच त्यांना तुमचा विचार करू. मात्र तिकीट मिळेलच अशी मी खात्री देऊ शकत नाही, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतरच त्यांना भाजपात स्थान देण्यात आले होते. मात्र त्यांचे मन आता बदलले. त्या उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्या. त्यांनी तिथे गळ्यात हार टाकून घेतला. तो त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आमच्यासाठी त्यांचा मुद्दा संपला आहे,” असेही गिरीश महाजन म्हणाले.

सत्यजित तांबे यांचेही होणार निलंबन

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांचे पक्षातर्फे निलंबन केले जाऊ शकते. तर विद्यामान आमदार तसेच एबी फॉर्म भरूनही उमेदवारी अर्ज न भरणाऱ्या डॉ. सुधीर तांबे यांच्यावर याआधीच काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. महाविकास आघाडी शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.