मागील काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि ती परिधान करत असलेली कपडे चर्चेचा विषय ठरतोय. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीने सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर नंगटपणा करू नये, अशी भूमिका घेतली असून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तर मी कोणते कपडे परिधान करावेत हे निवडण्याचा मला अधिकार आहे, असे म्हणत उर्फी जावेदने चित्रा वाघ यांच्या मागणीला थेट धुडकावून लावले आहे. तसेच चित्रा वाघ यांनी धमकी दिल्याचा आरोपही उर्फी जावेदने केला आहे. याच मुद्द्यावर आता राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या नवी मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

हेही वाचा >> पंकजा मुंडे खरंच नाराज आहेत? चर्चेवर चंद्रशेखर बावनकुळेंचे रोखठोक विधान! म्हणाले “अहो त्यांच्या रक्तात…”

शर्मिला ठाकरेंची दोन वाक्यांत प्रतिक्रिया

शर्मिला ठाकरे नवी मुंबईत क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी सामन्याच्या आयोजकांचे कौतूक केले. तसेच मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना उर्फी जावेद प्रकरणावर तुमचे महिला म्हणून काय मत आहे? असा प्रश्न केला. या प्रश्नाचे उत्तर देताना “मी पूर्ण कपड्यांत फिरते. बाकीच्यांचे मला माहीत नाही,” असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

हेही वाचा >> Supriya Sule saree Fire Video : सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट, उद्घाटन कार्यक्रमात घडली घटना!

मी माझ्या मुद्द्यावर ठाम

दुसरीकडे चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदसंदर्भातील भूमिकेवर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. “माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. तरिही मी त्याला घाबरत नाही. मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे. मला लोक विचारत आहेत की, चित्रा वाघ उठली की उर्फीवर बोलत राहते. पण मी उर्फीवर उठसूठ बोलत नाही. मला प्रश्न विचारले जात आहेत, म्हणून मी उत्तरं देते. सार्वनजिक ठिकाणी नंगटपणा नको, हा एकच मुद्दा मी मांडला आहे. या राज्यात एका आईचा आवाज चित्रा वाघने उचलला असेल तर त्यात वावगं काय?” असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

हेही वाचा >>उर्फी जावेदने भाजपमध्ये प्रवेश केला तर? पत्रकाराच्या प्रश्नावर चित्रा वाघ संतापल्या, “असल्या नंगट लोकांसाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चित्रा वाघ यांच्याकडून कडाडून विरोध होत असला तरी उर्फी जावेदवर मात्र कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. उर्फी जावेद अजूनही तोकड्या कपड्यांवरील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तर ट्वीटच्या माध्यमातून उर्फीने चित्रा वाघ यांना थेट लक्ष्य केले होते.