नाशिक – शुक्रवारी दुपारची वेळ. प्रत्येक जण आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असतांना बिबट्या शहरातील संत कबीर नगरात धडकला. बिबट्या दिसताच रस्त्यावरील नागरिकांनी इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिथरलेल्या बिबट्याने काही जणांवर हल्ला केला. त्यात दोन जण जखमी झाले. बिबट्या शहरात आल्याची माहिती मिळाल्यावर वनविभागासह पोलीस पथक परिसरात दाखल झाले. संत कबीर नगरातून बाहेर पडल्यानंतर बिबट्या भोसला मैदान आणि त्यानंतर महात्मा नगर परिसरात शिरला. बघ्यांची गर्दीही जमली. गर्दीला आवरण्याची कसरत करीत वन विभाग आणि पोलीस पथकाने अखेर सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद केले.

शहरात बिबट्याचा वावर नवा नाही. याआधीही बिबट्याने नागरी वस्तीमध्ये येत धुमाकूळ घातला आहे. काही वर्षापूर्वी दिवाळीमध्ये सिडको परिसरात, दहा वर्षापूर्वी महात्मा नगर परिसरात बिबट्या आला होता. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास संत कबीर नगरात सर्वप्रथम बिबट्या दिसला. बिबट्या दिसताच नागरिकांनी पळापळ सुरू झाली. बिबट्या दिसताच रस्त्याजवळील दुकाने दुकानदारांनी बंद करुन घेतली. एका मातीच्या घरात बिबट्या अडकला. त्याला त्याठिकाणी पकडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, तो घराच्या मागील बाजूने पळाला. पळालेला बिबट्या महात्मा नगर येथील वनविहार कॉलनी परिसरातील मोकळ्या मैदानात तसेच दोन- तीन इमारतींच्या परिसरात गेला. बिथरलेला बिबट्या समोर दिसणाऱ्या नागरिकांवर हल्ले करत होता. या हल्ल्यात सहा जण जखमी झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी दिली.

बघ्यांच्या गर्दीमुळे बिबट्याला जेरबंद करतांना वनविभागाला अडचणी आल्या. एका बेकरीमध्ये बिबट्या अडकला असता वनविभागाच्या वतीने त्याला बेशुध्द करण्याची तयारी करण्यात आली.परंतु, त्या ठिकाणाहूनही बिबट्या निसटला. तारामंगल ब या इमारतीत बिबट्या अडकला. वनविभागाच्या वतीने या ठिकाणी जाळ्या लावत त्याला बेशुध्द करण्यासाठी ट्रँक्युलायझेशन गनव्दारे इंजेक्शन देण्यासह अन्य तयारी केली. त्याचवेळी मंत्री गिरीश महाजन हेही त्या ठिकाणी आले. त्यांनी वन अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थिती जाणून घेतली. अखेर सहा वाजेच्या सुमारास बिबट्याला पहिल्यांदा गनव्दारे इंजेक्शन देण्यात आले. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत वनविभागाचे संतोष बोडके, प्रवीण गोलाईत हे दोन वनरक्षक जखमी झाले. बाहेर पडलेला बिबट्या मोकळ्या जागेच जाऊन बेशुध्द झाला. बिबट्या बेशुध्द झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यास विशेष वाहनात बंद केले. आणि सहा तासापासून सुरु असलेला बिबट्याचा थरार संपला.

बिबट्यांवर नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न -गिरीश महाजन

महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या हल्ल्यात याआधी बालकांसह काही जणांचा बळी गेला आहे. याविषयावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे.. वनमंत्र्यांशीही चर्चा करण्यात आली. मनुष्यबळ वाढविणे, पिंजऱ्यांची संख्या वाढविणे यासह काय करता येईल, हे ठरविण्यात येत आहे. बिबट्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांना गुजरातमधील वनतारा प्रकल्पात किंवा ज्या ठिकाणी तो सुरक्षित राहील अशा ठिकाणी सोडण्यात येईल, असे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारची वेळ. प्रत्येक जण आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असतांना बिबट्या शहरातील संत कबीर नगरात धडकला. बिबट्या दिसताच रस्त्यावरील नागरिकांनी इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बिथरलेल्या बिबट्याने काही जणांवर हल्ला केला. त्यात दोन जण जखमी झाले. बिबट्या शहरात आल्याची माहिती मिळाल्यावर वनविभागासह पोलीस पथक परिसरात दाखल झाले. संत कबीर नगरातून बाहेर पडल्यानंतर बिबट्या भोसला मैदान आणि त्यानंतर महात्मा नगर परिसरात शिरला. बघ्यांची गर्दीही जमली. गर्दीला आवरण्याची कसरत करीत वन विभाग आणि पोलीस पथकाने अखेर सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद केले.

शहरात बिबट्याचा वावर नवा नाही. याआधीही बिबट्याने नागरी वस्तीमध्ये येत धुमाकूळ घातला आहे. काही वर्षापूर्वी दिवाळीमध्ये सिडको परिसरात, दहा वर्षापूर्वी महात्मा नगर परिसरात बिबट्या आला होता. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास संत कबीर नगरात सर्वप्रथम बिबट्या दिसला. बिबट्या दिसताच नागरिकांनी पळापळ सुरू झाली. बिबट्या दिसताच रस्त्याजवळील दुकाने दुकानदारांनी बंद करुन घेतली. एका मातीच्या घरात बिबट्या अडकला. त्याला त्याठिकाणी पकडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, तो घराच्या मागील बाजूने पळाला. पळालेला बिबट्या महात्मा नगर येथील वनविहार कॉलनी परिसरातील मोकळ्या मैदानात तसेच दोन- तीन इमारतींच्या परिसरात गेला. बिथरलेला बिबट्या समोर दिसणाऱ्या नागरिकांवर हल्ले करत होता. या हल्ल्यात सहा जण जखमी झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी दिली.

बघ्यांच्या गर्दीमुळे बिबट्याला जेरबंद करतांना वनविभागाला अडचणी आल्या. एका बेकरीमध्ये बिबट्या अडकला असता वनविभागाच्या वतीने त्याला बेशुध्द करण्याची तयारी करण्यात आली.परंतु, त्या ठिकाणाहूनही बिबट्या निसटला. तारामंगल ब या इमारतीत बिबट्या अडकला. वनविभागाच्या वतीने या ठिकाणी जाळ्या लावत त्याला बेशुध्द करण्यासाठी ट्रँक्युलायझेशन गनव्दारे इंजेक्शन देण्यासह अन्य तयारी केली. त्याचवेळी मंत्री गिरीश महाजन हेही त्या ठिकाणी आले. त्यांनी वन अधिकारी, कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थिती जाणून घेतली. अखेर सहा वाजेच्या सुमारास बिबट्याला पहिल्यांदा गनव्दारे इंजेक्शन देण्यात आले. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत वनविभागाचे संतोष बोडके, प्रवीण गोलाईत हे दोन वनरक्षक जखमी झाले. बाहेर पडलेला बिबट्या मोकळ्या जागेच जाऊन बेशुध्द झाला. बिबट्या बेशुध्द झाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यास विशेष वाहनात बंद केले. आणि सहा तासापासून सुरु असलेला बिबट्याचा थरार संपला.

बिबट्यांवर नियंत्रणासाठी सरकारचे प्रयत्न -गिरीश महाजन

महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या हल्ल्यात याआधी बालकांसह काही जणांचा बळी गेला आहे. याविषयावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे.. वनमंत्र्यांशीही चर्चा करण्यात आली. मनुष्यबळ वाढविणे, पिंजऱ्यांची संख्या वाढविणे यासह काय करता येईल, हे ठरविण्यात येत आहे. बिबट्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांना गुजरातमधील वनतारा प्रकल्पात किंवा ज्या ठिकाणी तो सुरक्षित राहील अशा ठिकाणी सोडण्यात येईल, असे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.