नाशिक : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून गणल्या जाणाऱ्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या अतिशय चुरशीच्या निवडणुकीत अध्यक्षपद वगळता उर्वरित सर्व २० जागांवर सत्तारूढ प्रगती पॅनलची धूळदाण उडवत परिवर्तन पॅनलने बाजी मारली. प्रदीर्घ काळानंतर सभासदांनी मविप्रमध्ये सत्तापरिवर्तन घडवले. कार्यकारी मंडळातील प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत परिवर्तनच्या अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी प्रगती पॅनलच्या प्रमुख, विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांना पराभूत केले. अध्यक्षपदी प्रगतीचे सुनील ढिकले हे एकमेव उमेदवार विजयी झाले. त्यांनी परिवर्तनच्या आमदार माणिक कोकाटे यांचा पराभव केला. उर्वरित सर्व जागांवर प्रगतीच्या विद्यमान संचालकांसह अनेक दिग्गजांना पराभवाचे धनी व्हावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मविप्र शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे अंतिम निकाल मंगळवारी पहाटे अधिकृतपणे जाहीर झाले. कार्यकारी मंडळ आणि तालुका प्रतिनिधींच्या २१ जागांच्या मतमोजणीत प्रारंभीच्या फेऱ्यांत अटीतटीची वाटणारी लढत नंतर पूर्णत: परिवर्तनच्या बाजूने झुकली. काही जागांवर तीन वा चार उमेदवार रिंगणात होते. पण मुख्य लढत नीलिमा पवार, माणिक बोरस्ते यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ प्रगती आणि विरोधी अ‍ॅड. नितीन ठाकरे, आ. माणिक कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलमध्ये झाली. सभासदांची नाराजी दूर करण्यासाठी प्रगती पॅनलने बरीच धडपड केली. परंतु, एकतर्फी निकालाने ती व्यर्थ ठरल्याचे स्पष्ट झाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik news parivartan panel won maratha vidya prasarak sanstha election zws
First published on: 31-08-2022 at 00:15 IST