जळगाव – यावल तालुक्यातील सावखेडासिम गावानजीकच्या निंबादेवी धरणात दोन आदिवासी बालके बुडाली असून, यातील एकाचा मृतदेह मिळाला. दुसर्‍याचा शोध सुरू आहे. ही दोन्ही बालके निमछाव आदिवासी वस्तीवरील असून, गुरांना पाणी पाजण्यासाठी धरणावर गेली होती.  निंबादेवी धरण हे निसर्गसौंदर्यासाठी खानदेशात प्रख्यात आहे.

हेही वाचा >>> नाशिक: अनधिकृत बांधकामाविरोधातील तक्रारीमुळे उलटा ससेमिरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोणावळ्याच्या भुशी धरणाप्रमाणे निंबादेवी धरणाजवळही पायर्‍या असल्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. सावखेडासिम गावानजीकच्या निमछाव आदिवासी वस्तीतील नेनू  बारेला (१०) आणि आसाराम बारेला (१४) हे मंगळवारी गुरे चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाणी पाजण्यासाठी ते गुरांना घेऊन धरणात गेले. पाण्यात उतरल्यावर  दोन्ही बालके बुडाली. पोलीसपाटील पंकज बडगुजर यांनी ग्रामस्थांना घेऊन धरणस्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर शोधमोहीम राबविल्यावर आसाराम बारेलाचा मृतदेह सापडला. मात्र, नेनू बारेलाचा शोध लागला नाही. यावल पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनीही धाव घेत कार्यवाही सुरू केली.