नाशिक : अत्यंत संघर्षाच्या काळात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवार यांच्याबरोबर राहिल्याचा आनंद आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्याला आपली ताकद वाढवायची आहे. समविचारी पक्ष तयार असतील तर एकत्र अन्यथा स्वबळावर निवडणूक लढा, असे आवाहन राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी केले.

शरद पवार गटाची जिल्हा आणि शहर कार्यकारिणीची आढावा बैठक जिल्हा प्रभारी आमदार रोहित पवार, जिल्हा निरीक्षक सुनील भुसारा यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी येथे झाली. आगामी काळात पक्ष संघटनेत होणाऱ्या बदलांविषयी आढावा बैठकीत माहिती देण्यात आली. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींना गांभीर्याने घेण्याचा सल्ला रोहित पवार यांनी दिला. युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन संघटनेची नवीन बांधणी करण्याचे आश्वासन देण्यात आले. १० जून रोजी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाईल, अशी माहिती देण्यात आली. पक्षवाढ, पक्ष बांधणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या बैठकीस दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, प्रदेश प्रवक्ते विलास लवांडे ,ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, माजी आमदार नितीन भोसले, सुरेश दलोड आदी उपस्थित होते.