नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत १८ ते २० मे या कालावधीत नाशिक येथे येत आहेत. संघ शिक्षा वर्गात ते मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचा कार्यकर्ता विकास वर्ग प्रथम (सामान्य) १८ ते ४० वर्ष या वयोगटातील तरुण स्वयंसेवकांचा प्रशिक्षण वर्ग ११ मेपासून सुरू झाला आहे. या वर्गातील सहभागींना मार्गदर्शन करण्यासाठी सरसंघचालकांचे १८ मे रोजी दुपारी शिर्डी येथील विमानतळावर आगमन होणार आहे. शिर्डी येथे साई मंदिरात साईबाबांचे दर्शन घेऊन ते नाशिकला येतील. भोसला सैनिकी विद्यालयाच्या परिसरात या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

१८ ते २१ मेपर्यंत सरसंघचालक या वर्गस्थानी मुक्कामी राहणार आहेत. २१ मे रोजी सायंकाळी सहा वाजता ते पुढील प्रवासास मार्गस्थ होतील. या दरम्यान त्यांचे कोणतेही जाहीर कार्यक्रम होणार नाहीत. एक जूनपर्यंत चालणाऱ्या या वर्गात महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यातून म्हणजे संघ रचनेतील विदर्भ, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गुजरात आणि सौराष्ट्र अशा सहा प्रांतातील २८० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यात शेतकरी, लघुउद्योजक, डॉक्टर, वकील, व्यापारी, शिक्षक आदींसह उच्च महविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या वर्गात सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी हेही मार्गदर्शन करणार आहेत.