लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या घरफोडींमध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी येथील योगेश जाधव यांच्या दुकानात चोरट्यांनी प्रवेश करुन गल्ल्यातील रोख रक्कम व किराणा सामान असा ३७,३०२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

आणखी वाचा- “एक संधी नाकारताच पक्ष सोडणे म्हणजे…” गिरीश महाजन यांचा उन्मेष पाटील यांना टोला

दुसरी घटना येवला तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हेमंत गिते यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी संशयित प्रविण भोसले (२३. कोपरगाव) याने हत्याराने काढली. घरफोडीचा प्रयत्न केला. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वडनेर भैरव पोलीस ठाण्यातंर्गत घडलेल्या तिसऱ्या घरफोडीत योगेश शिंदे यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एक लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला.