मंचतर्फे आज आंदोलन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतातील उच्च शिक्षणाचा बाजार करू पाहणाऱ्या जागतीक व्यापार संघटनेसोबतच्या करारावर भारताने स्वाक्षरी करू नये या मागणीसाठी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचातर्फे पाच डिसेंबर रोजी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. १३ डिसेंबर रोजी नैरोबी येथे जागतीक व्यापार संघटनेतर्फे आयोजित सदस्य देशांच्या बैठकीत भारत सरकार एका करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भारतात उच्च शिक्षणाचा महागडा बाजार सुरू होईल अशी भीती व्यक्त करत असा करार सरकारने करू नये म्हणून अखिल भारत शिक्षण अधिकार मंच या संघटनेतर्फे सहा महिन्यांपासून देशभर जनजागरण केले जात आहे. देशभरातील कार्यकर्ते पाच ते १३ डिसेंबर या दरम्यान दिल्ली येथे आंदोलन करणार असून अनेक संस्था, संघटना त्यात सहभागी होणार आहेत. मंचही या संघटनेचा सदस्य असून या मोहिमेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी दुपारी १२ वाजेपासून आंदोलन करण्यात येणार आहे. या कराराविरुद्ध स्वाक्षरी अभियानही राबविले जाणार असल्याची माहिती मंचतर्फे देण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest against education corruption
First published on: 05-12-2015 at 01:47 IST