महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. हा राजकीय दौरा नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. मात्र, आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. हा दौरा खासगी असला तरी काही कार्यकर्ते आज राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ”मला साधू बनवता का?” असा प्रश्न विचारल्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला.

हेही वाचा – “सचिन वाझे हे उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते” ऑन रेकॉर्डचा उल्लेख करत आशिष शेलारांचा दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज श्रप्तशृंगी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यापूर्वी निफाडमध्ये असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांना भगवी शाल आणि त्रिशूळ भेट दिली. यावरून राज ठाकरे यांनी ”आता मला साधू बनवता का?” असा मजेशीर प्रश्न केला. राज ठाकरेंच्या या प्रश्नानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

हेही वाचा – ठाकरेंच्या घरातील सुंदर व्यक्तीमुळे एकाचा खून झाला? निलेश राणेंचं खळबळजनक ट्वीट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे यांनी नाशिकला येण्यापूर्वी शनिवारी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आज ( २ ऑक्टोंबर ) राज ठाकरेंनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह वणी येथील आदिशक्ती सप्तश्रृंगीदेवीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासमवेत मनसेचे पदाधिकारीही उपस्थित होते.