Release Gaudagourav presence dignitaries Literary Cultural Industrial Educational loksatta ysh 95 | Loksatta

मान्यवरांच्या उपस्थितीत ‘गौदागौरव’चे प्रकाशन

विविधतेने नटलेल्या शहराचे धार्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील वैशिष्टय़े अधोरेखित करणाऱ्या ‘लोकसत्ता’ निर्मित ‘गोदागौरव’ या नाशिक कॉफी टेबल बुकचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले.

मान्यवरांच्या उपस्थितीत ‘गौदागौरव’चे प्रकाशन
‘गोदागौरव’च्या प्रकाशन सोहळय़ात लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांचा सत्कार करताना दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे दीपक चंदे.

नाशिक : विविधतेने नटलेल्या शहराचे धार्मिक, साहित्यिक, सांस्कृतिक, औद्योगिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील वैशिष्टय़े अधोरेखित करणाऱ्या ‘लोकसत्ता’ निर्मित ‘गोदागौरव’ या नाशिक कॉफी टेबल बुकचे प्रकाशन शुक्रवारी करण्यात आले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, माजी मंत्री छगन भुजबळ, आ. देवयानी फरांदे, दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे दीपक चंदे, लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख, कवयित्री नीरजा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स प्रस्तुत ‘गोदागौरव’ या कॉफी टेबल पुस्तकाचे सहप्रायोजक मेट- भुजबळ नॉलेज सिटी हे आहेत. तिडके कॉलनीतील एसएसके सॉलिटेअर हॉटेलच्या सभागृहात शुक्रवारी सायंकाळी निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ज्येष्ठ कवयित्री नीरजा व लेखक-दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी माणसाचे विविधांगी पैलू उलगडणाऱ्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविक केले. नाशिकच्या विकासाशी संबंधित सर्व वैशिष्टय़ांचा कॉफीटेबल पुस्तकात समावेश आहे. प्रकाशन सोहळय़ास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रायोजक : दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स प्रस्तुत गोदागौरव या कॉफीटेबल पुस्तकाचे सहप्रायोजक मेट-भुजबळ नॉलेज सिटी आहेत.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
नंदुरबारच्या शहादामध्ये ट्रॅव्हल्स आणि आयशरची जोरदार धडक ; तीन जण ठार तर १७ जण जखमी

संबंधित बातम्या

जळगाव : शिंदे यांचीच शिवसेना खरी ; गिरीश महाजनांचा दावा; उद्धव ठाकरेंवर घणाघात
जळगाव: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाला चार वर्षे सक्तमजुरी
“योग्यवेळी मंत्रिमंडळ विस्तार”; अब्दूल सत्तार यांचे संकेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, भारताला आज विजय आवश्यक
UP Crime: कानपूरमध्ये शिक्षकाने गाठली क्रौर्याची सीमा, दोनचा पाढा विसरल्यानं विद्यार्थिनीच्या हातावर…
सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन सहकारी ठार
FIFA World Cup 2022: पोलंडचा सौदी अरेबियावर विजय; लेवांडोवस्कीची चमक
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!